भाग्य दिले तू मला - भाग १०२

  • 2.3k
  • 1.2k

हर बार जितसे अपनी खुशीया मिला नही करती कुछ खुशीया दुसरो को जिताकर खुद हार जानेमेभी मिल जाती है... पुन्हा एक सकाळ परंतु ही सकाळ काहीतरी खास होती. आज तिच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्ती तिच्या सोबत होत्या. आजपर्यंत स्वराच्या डोक्यात कुठला ना कुठला प्रश्न घर करून राहत होता पण ही एकमेव सकाळ होती ज्यावेळी स्वराच्या मनात, डोक्यात काहीच नव्हतं म्हणूनच की काय आज तोच आनंद तिच्या चेहऱ्यावर सतत दिसून येत होता. हा असा दिवस होता जिथे स्वराची सर्व स्वप्न पूर्ण झाली होती. अन्वयला मिळविताच स्वराच आयुष्य स्वर्गासारखं झालं होतं पण आईला त्यांचं नात मान्य नसल्याने अन्वयच्या विशेषतः स्वराच्या चेहऱ्यावर दुःखाची