भाग्य दिले तू मला - भाग १००

  • 2.8k
  • 1.6k

ए नसिब अपनी जित पर इतना गुरुर ना कर तेरी जितसे ज्यादा यहा मेरे हार के चर्चे है.... मागील काही महिने स्वराच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. तिने ह्या काही महिन्यात फक्त शांतता अनुभवली होती. आईच्या स्वभावात अचानक बदल झालेला तिला दिसून येत होता पण आई अजूनही तिच्याशी काहीच बोलल्या नसल्याने तिला अन्वय पासून दूर जाण्याची भीतीही सतावू लागली होती. स्वराने ह्या पूर्ण काळात अन्वयच्या घरच्यांचं मन जिंकून घेतल होत तरीही स्वराला मात्र त्या घरात पूर्ण अधिकार मिळाले नव्हते. हळूहळू दिवस जात होते आणि स्वरा आपल्या मनाची तयारी करू लागली. तिच्यासाठी इतकंही सोपं नव्हतं अन्वयची साथ सोडण पण ती त्याच्या