जिंदगी मे संघर्षसे मिठा और कुछ भी नही जित लो एक बार सांसो को फिर तुम्हे हराना आसान नही... स्वरा-अन्वयच्या आयुष्यात अलीकडे आनंद वाऱ्यासारखा दरवळू लागला होता. त्यांच्या जीवनातली ही अशी एक फेज होती जिथे ते दोघे सतत हसत होते. ह्या काही दिवसात त्यांना जगाच टेन्शन नव्हतं की स्वताच भान. अन्वयने इतकं सुंदर आयुष्य निर्माण केलं होतं की ती सतत वाहवत गेली, बाकी तिला त्यासमोर कधीच कुठल्याच गोष्टीची कमी जाणवली नाही. अन्वयच प्रेमच होत ज्यासाठी ती काहीही सहन करू शकत होती अगदी लोकांचा द्वेष, त्यांचं बोलणंही आणि अन्वय होता की लोकांमुळे तिला त्रास होऊ नये म्हणून सतत तिच्या चेहऱ्यावर हसू