गुंता मनाचा माझ्या जेव्हा तू सोडविला मी राहिले न माझी भाग्य दिले तू मला... मागचे चार- पाच दिवस स्वरान्वयच्या आयुष्यातले सोनेरी पर्व होते. स्वरा- अन्वय एकत्र आल्यावर प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे त्यांच्या समवेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पटलं होत. स्वरा-अन्वय शिवाय प्रेमाची व्याख्या खरच करता येत नाही म्हणून कदाचित ते दोन नावे सुद्धा आपोआप एक झाली. " स्वरान्वय " प्रेमाची नवीन व्याख्या. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला शिकविल की प्रेम म्हणजे नक्की काय असते. चेहऱ्याची सुंदरता क्षणिक असते पण मनाने केलेल प्रेम कधीच कमी होत नाही उलट ते आणखीच वाढत जात. हे काही दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचे होते त्यामुळे