भाग्य दिले तू मला - भाग ८९

  • 3.1k
  • 2.1k

कुछ पल मुझे लगा ये दुनिया ठेहर जाये हो संग तेरे युही जिंदगी क्यू ना खुदका ऐसा सुंदर शहर बनाया जाये... ती सकाळची वेळ. आजूबाजूला पहाडच पहाड, निसर्गाच सुंदर रूप खुलून आलं होतं. बोचरीही थंडी जाणवू लागली होती आणि स्वरा दुर्गा माते समोर नतमस्तक झाली होती. ती खूप दिवसाने अशी शांत जाणवत होती म्हणून आजही अन्वयची नजर मूर्तीवर नसून स्वराच्या चेहऱ्यावर होती. कदाचित अन्वयनेही तिला ह्याआधी अस कधीच बघितलं नव्हतं म्हणून तो शांतपणे तिला बघत होता. अगदी काही मिनिटे स्वरा तशीच उभी होती आणि अचानक तिने डोळे उघडले. अन्वय आताही तिच्याकडे बघत होता म्हणून तिने हळूच रागावत त्याला म्हटले," अन्वय