ये किसीं शाम की कहाणी नही मेरी जिंदगी का हिस्सा है रुलाकर खुश हो जाते है लोग उनके लिये तो ये सिर्फ एक किस्सा है.. स्वराच्या आयुष्यात अन्वय नक्की काय आहे हे तिला दोन दिवसातच कळलं होतं. ह्या दोन दिवसात अन्वयशी एकदाही बोलणं झालं नव्हतं आणि कायम हसत राहणाऱ्या, इंद्रधनूसारख्या रंग वाटणाऱ्या स्वराचा रंग कधी नाहीसा झाला तिलाच कळलं नाही. स्वराचा संघर्ष नक्कीच कौतुकास्पद होता पण स्वरा अन्वयविना अपूर्णच आहे हे सत्य ह्याक्षणी तिलाही नाकारता आलं नसत. स्वरा हे दोन दिवस अगदी शांत- शांत होती. अन्वय सोबत असताना तिला सतत हसवत असायचा त्यामुळे लोकांच्या बोलण्याचा प्रभाव कदाचितच तिच्यावर पडायचा पण