भाग्य दिले तू मला - भाग ८६

  • 3.4k
  • 1
  • 2.2k

पल भर की दुरी तेरी मेरा क्यू चैन ले गयी हुवा करता था हौसला अकेले लढ जाणे का तुम आये और वो मेरी आदत बिघड गयी... ती सकाळची वेळ होती. स्वरा अन्वयची बॅग भरत होती तर अन्वय आपल्या इतर वस्तू बॅगमध्ये नीट ठेवल्या आहेत की नाही म्हणून सर्व नजरेखालून काढत होता. त्याने सर्विकडे बघितले आणि जवळपास सर्वच वस्तू घेतली असल्याची त्याची खात्री पक्की झाली. तो काम करत असतानाही स्वराकडे लक्ष देऊन होता. ती ह्या पूर्ण वेळात त्याच्याशी एकदा देखील बोलली नव्हती. रुसवा तिच्या चेहऱ्यावर अस बसला की तिने त्याच्याशी बोलणेही पसंद केले नव्हते. तिला बघून अन्वय क्षणभर हसला आणि मागून