भाग्य दिले तू मला - भाग ८५

  • 3.1k
  • 1
  • 2k

कैसे समझाये दुनिया को मोहब्बत-ए-दास्ता वो चेहरे पे अडी है हमे दिलं से है वासता अन्वय- स्वराच्या लग्नाला ३ महिने झाले होते. हा प्रवास त्यांना वाटला होता त्यापेक्षाही जास्तच त्रासदायक गेला होता. ते स्वतःला आनंदी करायचा एखादा बहाणा शोधत तोपर्यंत एक नवीन आव्हान त्यांची आतुरतेने वाट बघत असायचे. स्वरालाही आता अंदाज येऊ लागला होता की आपल्याला वाटला तेवढा सोपा प्रवास हा नक्कीच नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरीही नात्यांच हे गणित आपण एकटे सोडवू शकत नाही. कदाचित प्रयत्न करूनही नाही म्हणून तिने आता विचार करणेच सोडून दिले आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना ती हसतमुखाने फेस करण्यासाठी हिम्मत गोळा करू लागली.