भाग्य दिले तू मला - भाग ८१

  • 3.2k
  • 2k

मेहक जाती हु मै तेरी खुशबुसे नही कोई यहा ऐसा परफ्युम जो मुझे दिवाना बनाये... सकाळची वेळ होती. स्वराचे सर्व काम आवरले होते. ती आता ऑफिसची तयारी करू लागली होती. अन्वयचा सकाळपासून काहीतरी वेगळाच मूड होता. आज फिरायला जाताना देखील अन्वय सतत तिच्याकडेच बघत होता आणि स्वरा लाजून पाणी पाणी झाली होती. आज असा एक क्षण नव्हता जेव्हा त्याने तिच्यावर नजर टाकली नव्हती. किचनमध्येही आज तो तिच्या मागे- मागेच होता. आई जेव्हा हॉलमध्ये येऊन बसल्या तेव्हा कुठे तो बेडरूममध्ये आला. तरीही त्याने तिच्याकडे बघन काही बंद केलं नव्हतं. स्वराला ते सर्व आवडतही होत पण त्याच्याकडे बघायची ती हिम्मतही करू शकत