एक उमर गुजारी है खुद का वजुद धुंडने के वासते फिर एक दिन युही तेरी आंखो मे हमने देखा सच केहते है हम तुझे देखकर हर सवाल भूल बैठे " क्या हो तुम- जिंदगी या खुदा?? " सायंकाळचे ७ वाजले होते जेव्हा अन्वय- स्वरा घराकडे निघाले होते. गाडी जसजशी समोर जात होती तसतसे मागचे लोक आणि आठवणी भराभर मागे जात होत्या तरीही स्वराचे अश्रू तसेच होते. गाडी सुरू होऊन बराच वेळ झाला असला तरीही त्यात काही बदल झाला नव्हता. अन्वयला तिला रडलेलं बघवत नसे पण आज ते अश्रू तिचा हक्क होता म्हणून तोसुद्धा काहीच म्हणाला नाही. तो अधून-मधून तिला न्याहाळत