भाग्य दिले तू मला - भाग ७६

  • 3.4k
  • 2.1k

सहवासात तुझ्या आयुष्य म्हणजे नभात फुललेली चांदरात असेल साथ तुझी असताना सुखांची अविरत बरसात असेल... " स्वरांवय- पर्व नव्या प्रेमाचे " तारीख १४ फेब्रुवारी...सकाळचे ११ च्या जवळपास झाले असावेत. अन्वयने आज ब्लू कलरची शेरवानी घातली होती. पायात मोजळी, एका हातात घड्याळ असा साधा पोषाख करून तो तयार झाला होता. त्याला आज पाहिलं असत तर कुणीच म्हटलं नसत की त्याचा आज विवाह आहे. त्याने आरशात एकदा स्वतःला बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड हास्य अवतले. त्याने पुढच्याच क्षणी समोर बेडवर पडलेला मोबाइल हातात घेतला. तो रूममधून बाहेर जाणारच की समोर पडलेल्या एका बॉक्सवर त्याची नजर गेली. त्या बॉक्सकडे बघताच अन्वयच्या चेहऱ्यावर पुन्हा