भाग्य दिले तू मला - भाग ७२

  • 3.3k
  • 2.2k

लोगो की सोच से परे है शहर की अपनी दुनिया इंसान बदलते है अपना फायदा देखके एक शहर ही है जो सबका साथ देते है ती सकाळची वेळ. स्वराचे आई वडील आपले सामान घेऊन रूमच्या बाहेर पडले होते. स्वरा अजूनही रूमच्या मध्येच होती. ती आज आपली प्रत्येक गोष्ट नव्याने बघत होती आणि ते सर्व शेवटच बघून ती भावुक झाली. जरी ह्या शहरातला तिचा सुरुवातीचा प्रवास थोडा वेदनादायक होता तरी ह्याच शहराने तिला एक नवीन ओळख दिली त्यात ह्या घराने तर तिची कायमच साथ दिली. मग ते आनंदाचे क्षण असो की दुःखाचे, हे घरच होत ज्याच्या चार भिंतीमध्ये ती आपल सुख