भाग्य दिले तू मला - भाग ६८

  • 3.6k
  • 2.4k

बदल जाती है तकदिरे किसीं के आने के बाद कम्बक्त नही बदलती जमाने की सोच भला कैसे इसको पार किया जाये?? ती सकाळची वेळ होती. अन्वय आज त्यांच्या घरी लग्नाबद्दल बोलायला जाणार होता म्हणून लवकरच उठला होता किंबहुना त्याला टेन्शनमुळे नीट झोप लागली नव्हती. स्वराच्या घरून तर त्यांना कुठला अडथळा झाला नव्हता पण त्याच्या घरून त्याला परवानगी मिळेल की नाही म्हणून अन्वय चिंतीत होता. त्यामागे तशी बरीच कारण होती फक्त तो कुणाला सांगू शकत नव्हता. त्याने घाई-घाईत लग्नाचा निर्णय तर घेतला होता पण हा निर्णय त्याच्या घरच्यांना तो इतक्या लवकर पटवून देऊ शकेल का ह्याच विचाराने त्याची झोप उडवली होती.