भाग्य दिले तू मला - भाग ६३

  • 3.8k
  • 2.7k

बडी बडी बातो से प्यार जाहीर नही होता मोहब्बत एक जरिया है याद का जहा मुर्दो को भी दफनाना आसान नही होता स्वरा अलीकडे फक्त आणि फक्त अन्वयचा विचार करत होती. त्याच्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी तिला आठवायच्या आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरायच. ती पुन्हा एकदा प्रेम हा शब्द नव्याने अनुभवू लागली होती. तिला खर तर अन्वयला त्याबद्दल सांगायचं होत पण त्याआधी ती त्याला ओळखून घेऊ लागली. त्या ओळखण्यात पण एक वेगळीच मज्जा असते. तो।ओळखण्याचा प्रवास हाच प्रेमाचा सर्वात सुंदर क्षण असतो. तिला प्रेम झालं आणि ती आधीच स्वरा पुन्हा परतली. गंमत करणारी, सतत हसणारी..ती आधीची अल्लड स्वरा आता वयानुसार