म्हणींच्या कथा - इकडे आड तिकडे विहीर

  • 6.7k
  • 2.9k

इकडे आड तिकडे विहीर शब्दशः(अक्षरशः) अर्थ: ह्या बाजूला आड आहे आणि त्याबाजूला बघितलं तर विहीर आहे त्यामुळे कुठे जावं कळत नाही,दोन्ही बाजूला जायला रस्ता नाही. गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ): चहूबाजुनी अडचणी आल्याने कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे कुठला उपाय करावा हे न कळण्याची परिस्थिती निर्माण होणे. द्विधा मनस्थिती होणे कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे.वरील म्हणीवर आधारित कथा: कथा क्रमांक एकरजत आणि पालवी चं लग्न झालं. दोघे एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांचं लव्ह मॅरेज झालं असंही म्हणता येईल.दोघांच्या घरून काही विरोध नव्हता पण रजत च्या आईला नोकरी न करणारी सून हवी होती परंतु रजत पुढे त्यांचं काही चाललं नाही. रजत