झोका - भाग 1

  • 15k
  • 2
  • 8.7k

डॉक्टर सुरेंद्र हे सरकारी डॉक्टर असल्यामुळे भानपूर नावाच्या गावात त्यांची बदली झाली होती,त्यामुळे ते व त्यांची पत्नी सुधा हे दोघे सरकारी संस्थेने ने दिलेल्या एका बंगल्यात राहायला आले.बंगल्यासमोर डॉ. सुरेंद्र यांची रिक्षा थांबली,डॉ. व त्यांची पत्नी सुधा सामान घेऊन खाली उतरले,खाली उतरल्या उतरल्या सुधाची नजर बंगल्याच्या नावकडे गेली, 'चाहूल' असं बंगल्याचं नाव होतं, त्याकडे बघून सुधा म्हणाली, नाव जरा विचित्रच वाटते, नाही! डॉ सुरेंद्र नी एकदा तिच्याकडे आणि एकदा घराच्या नावाकडे बघितलं आणि रिक्षाला पैसे चुकते करून चलाss असं हाताने चलण्याची खूण करून म्हंटल.सुधाने घराचं फाटक उघडलं तसे त्या फाटकाने मोठयाने करकर आवाज केला. थोडं दचकतच सुधा सुरेंद्र बंगल्यात शिरले, आत