सरकारनं पाठ्यपुस्तकाऐवजी आगामी काळात टॅब पुरवावेत? निपुण भारत योजना....... शासनाची ही आदर्शमय योजना. शासनाला या योजनेद्वारे सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे. हाच सरकारचा उद्देश. सरकारचं म्हणणं आहे की मुलं आपोआपच शिकतात. त्यांना शिकविण्याची गरज नाही. तसंच त्यांनी एक टार्गेटही ठेवलं की मुलांना तिसऱ्याच इयत्तेत वाचता यायला हवं. याबाबतीत सांगायचं झाल्यास एकीकडं सरकार म्हणतं की मुलांना अजिबात शिक्षकानं शिकवू नये तर फक्त मार्गदर्शन करावं तर दुसरीकडे सरकार म्हणतं की तिसरी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन यावं. परंतु ते कसं शक्य आहे? ते कळत नाही. यावरुन ती सरकारची कृती संभ्रमात टाकणारी आहे. कारण वर्ग तिसरीच्या वर्गात वाचता येईल. परंतु पुर्णच मुलांना