चालता चालता

  • 4.3k
  • 1.6k

चालता चालता.... सकाळी बागेत फिरायला जातो तेव्हा अनेक ओळखीच्या चेहऱ्यांबरोबरच काही अनोळखी चेहरेही नियमीतपणे दिसत असतात. खास व्यायाम म्हणून दररोज नित्यनेमाने फिरणारे सराईत लगेच ओळखू येतात. काही लोक अधूनमधून आठवण आली की फिरायला येताना दिसतात.शनिवार रविवारी सुट्टी म्हणून फिरायला येणारे, डॉक्टरने 'सकाळी फिरत जा; नाही तर तुझे काही खरे नाही ' म्हणून नाईलाजाने फिरत असलेले लोक लगेच ओळखता येतात. काही महिला आपल्या चिमुकल्याला स्ट्रोलरवर टाकून कोवळ्या सूर्यकिरणात त्याला फिरवत असतात.एका हातात मोबाईल आणि दुसऱ