नाद पावलांचा- सावंतवाडी ते नळदुर्ग प्रवास जूनची ३ तारीख भर उन्हाळा..सूर्य आग ओकतोय आणि आम्ही चारजण...नळदुर्ग बघायला बाहेर पडलो. आमच कोणतही ठोस नियोजन नव्हते.कुणकेरी हायस्कूलचे आंबेस्करसर, मुननकरसर त्यांचा तरूण मुलगा धर्मेश व मी सकाळी साडेसहाला बाहेर पडलो.दाणोलीला साटममहाराजांना नमस्कार करून आंबोली घाट पार केला..आंबोलीची गर्द हिरवीदरी अजुनही सूर्यकिरणाच्या प्रतिक्षेत होती.प्रवासात आम्ही निपाणीच्या वरच्या माळावर नाष्ट्यासाठी थांबलो.मी नाष्ट्या येण्याची वाट बघत होतो तेवड्यात.." बाळा राणे..." अशी हाक ऐकू आली.समोर वाडीतला पंजक धुरी सहकुटुंब आलेला दिसला. वाडीत भेट होत नाही पण इथ मात्र समोरा - समोर उभे होतो.थोडी गंमत वाटली.नाष्टा घेता-घेता ठरल की निपाणी चिक्कोडी मार्गे विजापूरला जायच. तिथून मग अक्कलकोट नंतर