गीत रामायणा वरील विवेचन - 12 - स्वयंवर झाले सीतेचे

  • 2.9k
  • 1.3k

मिथिलेत जनक राजाच्या दरबारी आल्यावर जनक राजा विश्वामित्र ऋषींना वंदन करतात व श्रीराम व लक्ष्मणाचे स्वागत करतात. त्यांचे आदरातिथ्य झाल्यावर त्यांना स्वयंवरात आमंत्रित करतात. दरबाराच्या मध्यभागी एका चौरंगावर एक मोठा महाकाय धनुष्य ठेवला असतो. त्या धनुष्याला उचलून जो त्याला प्रत्यंचा लावेल तो पुरुष स्वयंवरात विजेता ठरेल आणि त्याच्याच गळ्यात सीता देवी वरमाला घालतील असा स्वयंवराचा नियम जनक राजाने ठरवला असतो. राजाने असा पण का ठेवला असतो त्यामागे एक कथा आहे जी खाली नमूद केली आहे: ( महादेवाची आराधना केल्यावर स्वयं शंकरच परशुरामांना स्वतः चा धनुष्य प्रसन्न होऊन देतात. तो धनुष्य परशुराम सदैव आपल्या जवळ बाळगतात. एकदा असेच परशुराम जनक राजाकडे गेले