आधारकार्ड आधारासाठी की निराधार करण्यासाठी? ऑनलाईन कामं........आज सर्व कामं ऑनलाईन स्वरुपात करणं सुरु झाली आहेत. मात्र ऑनलाईन कामं करीत असतांना काही फायदेही आहेत तर काही नुकसानही आहेत. जसे. ऑनलाईन स्वरुपात बँकेचा व्यवहार होत असल्यानं कधीकधी अकाउंट हॅक करुन बँकेच्या खात्यातून पैसे चोरीला जाणे. असे कितीतरी लोकांचे पैसे चोरीला जात असतात. ऑनलाईन कामं करणं चांगलं आहे. त्या कामातून कोणाचाही कोणताही रेकॉर्ड लपून राहात नाही. कोणाला कोणताही फसवणूकीचा व्यवहार करता येत नाही. सगळं एका क्लीकवर दिसतं. जसं पुर्वी एक शेत अनेकांना विकलं जात होतं. आता तसं नाही. कारण कोणं शेत घेतलं हे सुद्धा ऑनलाईन सातबाऱ्यावर एका झटक्यात पाहायला मिळत असतं. तसंच जागेचंही