नाती -एक विखारी प्रवास ती त्याच्या खांद्यावर मान ठेवून डोळे मिटून बसली होती. तिला खुप दिवसांनी शांत झोपायच होत पण झोप येत नव्हती. बसच्या खिडकीतून येणारा गार वारा अंगाला स्पर्श करून जात होता.बाजूने जाणार्या वाहनांचा आवाज मध्ये-मध्ये कानात पडत होता.विचारांचे अनेक भुंगे तिचा मेंदू कुरतडत होते. तिने मान झटकली. तिची चुळबुळ बघून त्याने हलकेच तिच डोक प्रेमाने थोपटले. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले अर्धवट प्रकाशात त्याच्या डोळ्यातले भाव तिला वाचता आले नाहित. " हे सगळं खर आहे?" तिने विचारले. " का? तूला शंका का आली? मागच सार आयुष्य विसर. आपण दोघ नव आयुष्य जगणार आहोत...नव्या उमेदीने...मी ...मी तुला सुखात ठेवीन.