खौफ की रात - भाग २७

  • 4k
  • 2k

भाग २७ साडे चार फुट उंचीची , हडळीसारखी जाडजूड शरीरयष्टी असलेली पिया मान जमिनीच्या दिशेने खाली झुकवून उभी होती- डोक्यावरचे केस सुटले होते..चेह-यावर लोंबत होते..केसांनी पुर्ण चेहरा झाकला होता.. " प..प्प.पिया..!" आवडीने जरा दूरूनीच तिला हाक दिला. पन तिच्या देहाची काडीचिही हालचाल झाली नाही. अघोरीबाबा जागेवरून उठले .. त्यांनी हातात राख घेतली.. " ए पोरी..? ए पोरी?" अघोरीबाबांनी राख असलेला हात वर आणला तोच तेवढ्यात पियाने मान वर केली.. "स्स्स्स आह्ह्ह्ह , माझ डोक दुखतय खुप ! " पियाचा आवाज सामान्य होता. " पिया ..!" आवडी चालत तिच्या जवळ आली. " तू ..बरी आहेस का? तुझ्या अंगात लालसटवी घुसलीये पिया..!"