भाग्य दिले तू मला - भाग ४०

  • 5.3k
  • 3.6k

किसी से दिल लगाने की खता क्या होगी? रुठ जाने की वजह क्या होगी? हम सोच रहे शाम-ओ-सहर इस पहेली का जवाब किसी को इन्कार करने की सजा क्या होगी? सकाळचे १०:३० च्या आसपास झाले होते जेव्हा स्वरा उठली. आज ती जरा फ्रेश वाटत होती. चेहरा थोडा प्रफुल्लित वाटत होता आणि डोकंही दुखणं बंद झालं होतं. ती उठताच माधुरीने तिच्या कपाळाला हात लावला. तिचं अंग थंड पडलं होतं शिवाय तिच्या चेहऱ्यावर हसू बघताच माधुरी उत्तरली, "गुड मॉर्निंग ताई!! आता कस वाटत आहे तुला?" स्वराने तिचा हात पकडला आणि तिच्या हातांना किस करत म्हणाली, "तू असताना कशी असणार बरं? मी मस्त.