भाग्य दिले तू मला - भाग ३५

  • 5.5k
  • 3.7k

सुबहँ की अजाणसी पाक लगना चाहती हु मै मोहब्बत हु दिलबरो दिलो पर राज करणा चाहती हु स्वराच आयुष्य अचानक बदलू लागलं होतं. ती स्वतःच्याच नकळत हसू लागली होती. तिला खुश राहायला आता कुठलंच कारण लागत नव्हत. ती स्वतःहून माधुरीसोबत फिरायला निघत असे आणि नकळत हजारो गप्पा मारल्या जाऊ लागल्या. हळूहळू तिच्याही नकळत ती जुनी स्वरा परतू लागली होती. तिचा चेहरा तोच होता पण तिचे विचार बदलू लागले होते. स्वरा कायम आनंदी असायची पण जेव्हा कधी ती उदास असायची तेव्हा अन्वय काहीतरी कारण काढून तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलवायचा आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू परतायचं. हे सर्व अन्वयमुळे होत का? कदाचित