आरजु नही कोई , ना कोई ख्वाहिश है जिना मेरा खुद ही एक रंजीश है किससे की जाये सिफारीश जिने की यहा तो हर तरफ लोगो की साजिश है अलीकडे स्वराच आयुष्य सेटल व्हायला आलं होतं. ती नाईलाजाने का होईना पण ऑफिसमध्ये गुंतली होती पण कुलकर्णी सरांनी बदलीची बातमी सांगताच स्वरा जरा घाबरली. स्वराच्या घाबरण्यामागे काही कारण होत. एक म्हणजे स्वराला जॉब शिफारशीमुळे मिळाली होती आणि दुसर कारण म्हणजे कुलकर्णी सरांनी तिला सांभाळून घेतले होते पण दुसरा कुणी नवीन येईल आणि त्याला आपल्याबद्दल कळलं तर इतर लोकांनी जशी आपल्याला नौकरी दिली नाही तसच त्यानेही काढून टाकले तर पुन्हा तीच आयुष्य