भाग्य दिले तू मला - भाग २७

  • 6k
  • 4.1k

बेआब्रू करके पुछते होे तकलीफो की वजहँ हुनर लोगोसेही सिखा है या खानदानी पेशा है मुलाखतीचा दिवस. स्थळ दादर. ११ वाजले होते. स्वरा अर्ध्या तासांपासून एकटीच बेंचवर बसून होती. आधी तिचा जेवढा कॉन्फिडन्स होता तेवढा ह्यावेळी तिच्याकडे नव्हता. मागचे मुलाखतीचे अनुभव त्याला जबाबदार होते. स्वरा जरा घाबरली होती. तिच्या डोक्यात कितीतरी प्रश्न सुरू होते कारण आज जॉब मिळाली नसती तर कदाचित तिने काय केलं असत तिलाच माहिती नव्हत. ती विचारात हरवली होतीच की रिसेप्शनिस्ट म्हणाली," मॅडम आपल्याला आतमध्ये बोलावलं आहे." रिसेप्शनिस्टचा आवाज येताच स्वराने आपल्या चेहऱ्यावर गोड हसू आणलं आणि हळूहळू पावले टाकत मुलाखत घेण्यात येणार होती तिथे जाऊ लागली.