मुश्किलमे हो जिंदगी उसको आसान बनाना है तकलीफे तो होगीही लढते हुये चलो मिलकर उन्हे हराना है स्वराने निर्णय तर घेतला होता पण दिल्लीला निघायला तिला ६-७ दिवस लागणार होते त्यामुळे तिने निर्णय घेतल्यापासूनच अभ्यासाला सुरुवात केली होती. फक्त पंधरा दिवस अभ्यासासाठी अपूर्ण होते पण आज तिने हार मानली असती तर पूर्ण वर्ष वाया गेल असत म्हणून जोमाने ती अभ्यासाला लागली. सुदैवाने तिने बुक्स सोबत आणले होते त्यामुळे ते शोधण्यात वेळ गेला नव्हता. काय दिवस, काय रात्र स्वरा फक्त अभ्यासच करत होती. तिला आता जगाची चिंता नव्हती. तिने यशस्वी होण्याच्या दिशेने आज पुन्हा पहिले पाऊल टाकले होते. तिच्यासाठी ते सोपं