प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत. खरच अस असत का? नक्कीच नाही. चुकीच्या पध्दतीने मिळविलेल प्रेम कधी ना कधी दूर जातच. प्रेमात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. एकदा तो विश्वास तुटला की मग कितीही प्रयत्न केला तरीही तो विश्वास, प्रेम कधीच परत मिळवू शकत नाही. युद्धाचेही जसे काही नियम असतात तसे प्रेमाचेही असतात त्यामुळे युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत हे बोलणं योग्य नाही. नाही तर स्वरासारख्या कित्येक मुलीवर प्रेमाच्या नावाने होणारे ऍसिड अटॅक, रेप योग्यच असते आणि काहीही चूक नसताना स्वरासारख्या कित्येक मुलींना हे सहन कराव लागलं असते. दिवस हळुहळु जात होते. स्वरा शरीराने ठीक होत होती पण