भाग्य दिले तू मला - भाग १६

  • 6.2k
  • 4.5k

माझी चूक काय ????????? तिने विचारलेला प्रश्न सर्वाना विचारात पाडणारा होता आणि कुणाकडेच त्याच उत्तर नव्हतं. हा तिचा एकटीचा प्रश्न नव्हताच तर अशा हजार स्त्रिया असतील ज्यांना विनाकारण शिक्षा मिळते मग तो रेप असो की ऍसिड अटॅक? साध्य काय होत ह्याने, मर्दांनगी? पण खरी मर्दांनगी तर स्त्रीचा आदर करण्यात, तिचे रक्षण करण्यात आहे मग मुलींचे चेहरे बिघडवून त्यांच्यावर रेप करून नक्की काय मिळत? समाधान आणि कशाचं? उत्तर त्यालाही माहीत नसेल जो हे सर्व करतो. दिवस बदलत गेले आणि पण स्त्रियाबाबतीत हा प्रश्न अजूनही तिथेच आहे. माझी काय चूक? ना त्यांना ह्याच उत्तर कधी मिळाल ना स्वराला कधी मिळणार उलट ती