भाग्य दिले तू मला - भाग १७

  • 5.8k
  • 4.1k

आयुष्यात सर्वात अवघड आणि सर्वात सोप काय असत माहिती आहे? सर्वात अवघड असत ते आपली चूक नसतानाही लोकांची शांतपणे बोलणी ऐकणे आणि सर्वात सोप असत आपली चूक आहे हे माहिती असतानाही लोकांना ओरडून ओरडून सांगणं की मी कसा योग्य आहे. हे सांगण्याच कारण अस की स्वराची चूक नसतानाही स्वरा येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच, प्रसारमाध्यमांच गपगुमाने ऐकत होती तर राजच नाव सर्वांसमोर आल्यापासून राज आपण कसे निर्दोष आहोत आणि स्वरा कशी चुकीची आहे ह्याबद्दल वाच्यता करत होता. स्वराला जेव्हा हे सर्व कळालं तेव्हा ती एकटीच वेड्यासारखी हसत होती. तिला काय योग्य, काय अयोग्य ह्यातला फरक सुद्धा आता समजेना आणि तिला काहीच दिवसात