भाग्य दिले तू मला - भाग १५

  • 6.4k
  • 1
  • 4.7k

स्वरा मोठ्याने किंचाळली. तिच्या आवाजाने आजूबाजूच सर्व काही शांत झाल होत. क्षणभर सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावर होत्या. तर ती चेहऱ्यावर हात ठेवून किंचाळत राहिली. तिच्या किंचाळल्याने पूजाच लक्ष तिच्याकडे गेलं. ती सर्व सामान फेकत धावतच तिच्याकडे आली. ती पोहोचेपर्यंत आजूबाजूचे सर्व लोक गोळा झाले होते. गाड्याची लांबच लांब रांग लागली होती. गाड्यांचे कर्कश हॉर्न वाजत असतानाही त्या सर्वात एकाच व्यक्तीचा आवाज सर्वात मोठा होता. स्वरा आई आई म्हणून ओरडत होती. सर्वाना काय झालंय काहीच कळत नव्हतं. पूजा तिच्या बाजूला पोहोचली आणि तिच्या चेहऱ्यावरचा हात जबरीने काढू लागली. तिने तिचा हात काढलाच होता की समोरच दृश्य बघून ती स्वतःच खाली कोसळली.