रात्रीची वेळ होती. स्वरा, पूजा दोघीही आपल्या बेडवर बसल्या होत्या. स्वरा पुन्हा एकदा गुमसुम होती तर पूजा तिला काय झालंय म्हणून काम करता करता हळूच स्वराकडे लक्ष देत होती. स्वराने दिवसभर तर स्वतःच्या भावना सावरून धरल्या होत्या पण आता तिला ते लपवन कठीण जात होतं. ती स्वयम समोर मन घट्ट करून सर्व ऐकत राहिली होती पण तीच तिलाच माहिती होत की तिला त्याच्या बोलण्याचा किती त्रास होत होता. त्याचा प्रत्येक शब्द तिला अनंत यातना देऊन गेला होता. तिला हे नातं समोर न्यायला त्याच्यावर बळजबरी करायची नव्हती म्हणून ती शांत बसली होती पण आता तिला रडू आवरत नव्हतं आणि अचानक तिच्या