भाग्य दिले तू मला - भाग १२

  • 6.9k
  • 5k

स्वयमच्या शब्दांनी आज ती पूर्णता तुटली होती. गेले कित्येक दिवस ती त्याला हे सर्व सांगायला वाट पाहत होती पण त्याने दोन तीन वाक्यात तिच्या स्वप्नांची राख - रांगोळी केली. त्याने तिच्या प्रेमाला स्वीकारले नाही ह्याच दुःख तर तिला होतच पण तो अशा पद्धतीने तिला नकार देईल असा स्वप्नातसुद्धा तिने विचार केला नव्हता. ती कितीतरी वेळ वेड्यासारखी तशीच उभी होती. हळूहळू सर्व गाड्या सुद्धा पार्किंग मधून नाहीशा झाल्या होत्या पण तिला कशाचच भान नव्हतं. ती शांत होती. तिला पुढे काय करायला हवं काहीच कळत नव्हतं म्हणून ती तिथेच उभी राहिली. काही क्षण गेले. अंधार पडू लागला होता आणि नाईलाजाने तिचे पाय