भाग्य दिले तू मला - भाग ११

  • 7k
  • 5.2k

स्वरा आज आपल्या मनातल सांगता सांगता राहिली होती त्यामुळे रूमवर आल्यापासून तिचा चेहरा उदास जाणवत होता. रूमवर आल्यावर पूजाला तिने पूर्ण हकीकत सांगितली आणि सकाळी खुश असलेली पूजाही आज नाराजच बसली होती. रूम आज पूर्णता शांत भासत होती. आज स्वराचा अभ्यास करायचा मूड नव्हता म्हणून बाहेर गॅलरीमध्ये ती एकटीच बसली होती. स्वराच्या डोक्यात सकाळी घडलेल्या गोष्टी तर सुरूच होत्या पण त्याच्या बाबांची तब्येत चांगली नाही हे ऐकून तिला आणखीच जास्त वाईट वाटत होतं. तिने रूमवर आल्यापासून त्याला कितीतरी कॉल केले होते पण त्याने एकाही कॉलला उत्तर दिले नव्हते. अगदी साधी विचारपूस सुद्धा केली नव्हती. तेवढ्याच वेळात तिच्या मोबाइलवर मॅसेज आला