स्वयमने वाढदिवसाच्या दिवशी झालेला किस्सा जाऊ दिला होता पण आता जे त्याने स्वराच्या तोंडून ऐकलं होतं ते तो काहीही केल्या विसरू शकत नव्हता. त्याच्या डोक्यात ते घट्ट बसल होत. काहीतरी नक्कीच विचित्र आहे हे त्याला जाणवलं होत आणि आता तो स्वराच्या वागण्यावर बारीक लक्ष देऊ लागला. एक तर तो आधीच शांत पण शंकेमुळे तो आणखीच शांत झाला होता. तिच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे ह्याचा तो शोध घेऊ लागला होता आणि त्याला वाटत होतं तस खरच घडू लागलं होतं. स्वराच एखादं काम निघालं की ते आपोआप पूर्ण व्हायचं. अभ्यासासाठी सर्व साधने, हॉस्टेलमध्ये सर्व सोयी सुविधा तिला अशाच मिळाल्या नव्हत्या. त्याला