भाग्य दिले तू मला - भाग ९

  • 6.8k
  • 5.1k

स्वराचा वाढदिवस तर झाला होता पण त्यादिवशी स्वयम काही आपल्या विचारातून बाहेर आला नाही. ती वाढदिवसाच्या दिवशी आनंदी होती म्हणून त्याने तिचा आनंद हिरावून घेतला नाही पण हे खरं की त्याच्या डोक्यातुन तो विचार पूर्णता गेला नव्हता. वाढदिवसानंतर सुद्धा तो त्याबद्दलच विचार करत असे पण तिला कळलं असत की एवढं सर्व स्पेशल त्याने नाही केलं तर ती आणखीच जास्त दुखावली जाईल त्यामुळे तेरीभी चुप मेरीभी चुप म्हणत त्याने तो विषय तिथेच सोडून दिला. इकडे स्वरा खूप खुश होती. तो हेल्पफुल आहे, त्याच्यात हजार चांगले गुण आहेत हे तिला माहिती होत पण इतका रोमँटिक स्वयम तिने कधीच बघितला नव्हता त्यामुळे ती