भाग्य दिले तू मला - भाग ७

  • 7.1k
  • 5.3k

प्रॅक्टिकलमध्ये गंमत करता करता आता सबमिशन सुरू झाले होते. पहिल्या सेमच्या पेपरला काहीच दिवस असल्याने सर्वच अभ्यासाला लागले होते. स्वराला अभ्यासात काही त्रास झाला की स्वयम तिची मदत करत असे किंबहुना सर्व बुक्स तोच तिला आणून देत असे त्यामुळे त्याचा स्वभाव पाहून ती त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागली होत. तर तो कुठल्याही अपेक्षेविना तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार होता. हळुहळु स्वराही त्याच्या स्वभावाची मोठी फॅन झाली. आज स्वरा, पूजा आणि स्वयम अभ्यास करायला लायब्ररीला थांबले होते. स्वयम तिला कुठलातरी टॉपिक समजावून सांगत होता तर पूजा अगदी मन लावून सर्व एकत होती नेमकं त्याच वेळी स्वराला काय सुचलं माहिती नाही ती पूजाला