भाग्य दिले तू मला - भाग ६

  • 7.9k
  • 6k

प्रत्येक नात्यात महत्त्वाचे असतात प्रेम , आदर आणि विश्वास. एकमेकांवर प्रेम होणं नक्कीच सोपं आहे पण एकमेकांचा आयुष्यभर आदर करून त्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळी स्पेस देणे आणि कशीही परिस्थिती आली तरीही तो विश्वास कमी होऊ न देणे ह्यातच नात्यांच यश लपलेलं असत. ह्यातली एकही गोष्ट नाहीशी व्हायला लागली की प्रेम आपोआप संपत जात. जे प्रेम अथांग असत त्याला सुरुंग लागतो आणि ते हळूहळू केव्हा नाहीस होत कळत सुद्धा नाही. स्वरा त्याच्या घरी गेली तेव्हापासून त्याच्यावरचा विश्वास आणखीच प्रबळ झाला होता. त्याच्या आईवरून कुटुंब किती शांत संस्कारी आहे हे तिला कळून चुकलं होत. प्रेमात कुटुंबही तर महत्त्वाचं असतच कारण आपण कितीही