गीत रामायणा वरील विवेचन - 10 - चला राघवा चला

  • 3k
  • 1.4k

श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींनी सांगितल्यावर त्राटीकेचा वध केला आणि अखेर यज्ञ संपन्न झाला. यज्ञ संपन्न झाल्यावर श्रीराम व लक्ष्मण यांनी ऋषी विश्वामित्र यांना स्वगृही परतण्याची आज्ञा मागितली पण विश्वामित्र ह्यांनी त्यांना त्यांच्या समवेत मिथिला नगरीत चलण्यास आग्रह केला. हे श्रीरामा आम्हास राजा जनक यांचं त्यांच्या राज दरबारात होणाऱ्या यज्ञासाठी आमंत्रण आहे. मिथिला नगरी तर सुंदर आहेच पण त्याही पेक्षा तिथला जनक राजा खूप चांगला आहे. तेथील यज्ञ मंडपी राजा जनकाने सुनाभ नामक धनुष्य ठेवलेला आहे. जो धनुष्य साक्षात शंकरांनी जनकाला दिला. त्याच धनुष्यानी महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या धनुष्याची जनक राजा रोज पूजा करतो. धनुष्य एवढा जड आहे की ठीक