गीत रामायणा वरील विवेचन - 9 - मार ही त्राटीका, रामचंद्रा

  • 3.2k
  • 1.4k

श्रीराम व लक्ष्मण विश्वामित्र ऋषींसोबत त्यांच्या यज्ञस्थळी पोचतात. विश्वामित्र ऋषी इतर ऋषीगणांसह आता निश्चिन्त पणे यज्ञास स्थानापन्न होतात. श्रीराम व लक्ष्मण दैत्य येतात का हे बघण्यास आणि त्यांच्याशी लढण्यास सावध पवित्रा घेऊन उभे असतात. यज्ञ सुरू असतो. यज्ञ मध्यावर येताच कुठूनतरी राक्षसांची झुंड तिथे प्रकट होते. श्रीराम व लक्ष्मण सावध च असतात ते त्या सगळ्यांचा नायनाट करतात. विश्वामित्रांना व इतर ऋषींना हायसं वाटते. यज्ञात आहुती टाकणं सुरू असते. पुन्हा दैत्यांची फौज येते. इकडून दैत्यांचे हत्यारं यज्ञाच्या दिशेने सुटतात तिकडून श्रीरामाचे बाण दैत्यांच्या दिशेने सुटतात. पुन्हा श्रीराम व लक्ष्मणाचे बाण लागून सगळ्या दैत्यांचा नाश होतो. थोडावेळ गेला नाही की पुन्हा पुन्हा