*घटस्फोटाची प्रकरणं; एक चिंतेची बाब* *लिव्ह इन रिलेशनशीप हा कायदा विवाह न करणाऱ्या लोकांसाठी असावा. विवाहानंतरच्या लोकांसाठी नको. तसा कायद्यात बदल व्हावा. अलिकडील वास्तविक परिस्थिती पाहता न्यायालयात घटस्फोटाची दाखल होणारी प्रकरणं जास्त आहेत व ती वाढतच आहेत. ही वाढत आहेत लिव्ह इन रिलेशनशीपच्या सरकारच्या कायद्यामुळे. तसं पाहता न्यायालयानंही इतर देशाप्रमाणे याही देशात लोकांना लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण्याची मुभा दिलेली आहे. तसं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये देशात कोणत्याही वयातील स्री व पुरुषांना राहता येतं. त्यातच अशा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये लोकं आपले आपले विवाहाचे पती वा पत्नीच सोडून नाही तर चांगला रमलेला संसार सोडून राहतात. परंतु यानं संसार उध्वस्त होतो. विवाहाला फाटा