गीत रामायणा वरील विवेचन - 8 - ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा

  • 3.4k
  • 1.5k

हळूहळू श्रीराम व त्यांचे तीनही अनुज दिसामासाने वाढू लागले. पाहता पाहता श्रीराम आठ वर्षांचे झाले. त्यांचा मौन्ज विधी झाला आणि त्यांना व त्यांच्या भावांना वसिष्ठ ऋषींच्या आश्रमी विद्याअध्ययन करण्यास पाठविण्यात आले. तिथे गुरुकुलात गुरु वसिष्ठ व गुरुमाता अरुंधती ह्यांच्या छत्र छायेखाली सगळ्या विद्या श्रीरामांनी व त्यांच्या तीनही भावांनी आत्मसात केल्या. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रीरामांचे बुद्धीचे तेज वेळोवेळी सगळ्यांना दिसून आले. वसिष्ठ ऋषींनी घेतलेल्या अनेक कसोट्यांमधून श्रीराम सदैव उत्तीर्ण झाले. आणि वेदाभ्यास, युद्धनीती,राजनीती आदी सगळे शिक्षण घेऊन गुरूंना यथायोग्य गुरुदक्षिणा देऊन गुरू व गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन श्रीराम व त्यांचे बंधू स्वगृही परततात. आता श्रीराम किशोरवस्थेत असतात. स्वगृही परतल्यावर काही काळाने ऋषी विश्वामित्र