रक्तकेतु भाग ३चेन्नईहून माझं काम आटपून मी परत आलो होतो घरी आलो तेव्हा दुपारचे अडीच वाजलेले होते. सकाळची फ्लाईट उशिरा आलेली होती. मी बेल वाजवली दारामध्ये दीपा उभी होती."अविनाश कधी आलास. . .?""मी तुझी किती वाट पाहिली. . .!". "मला करमतच नव्हतं". दीपाआमच्या घरात दीपाला पाहून मला नवल वाटल नव्हत, काही तरी अघटीत प्रकार बघायला मिळेल याची मला अगदी खात्री होती.राघवन च्या सामर्थ्याला तोड नव्हती एवढं मात्र खर !!!दीपाला हाताने बाजूला करून मी घरात आलो, ती सारखी माझ्या अवतीभवती होती. बडबड चालू होती. गळ्यात टाईप नव्हताच. मी किचन मध्ये आलो ही स्वयंपाक करत होती. चेहरा गंभीर पेक्षा जास्त चिंताक्रांत, चेहऱ्यावर