सिद्धनाथ - 4

  • 5.5k
  • 2.7k

सिद्धनाथ ४ (दानव) पंचगंगेंच्या घाटावर स्नान करून सिद्धनाथ अंबाबाईच्या मंदिराच्या दिशेने निघाला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजलेले होते. "शिवगोरक्ष शिवगोरक्ष ....." जप करत सिद्धनाथ झपाट्यानं चालत होता, जवळ जवळ दीड ते दोन km अंतर होत. हवेत कमालीचा गारठा होता. अगदी पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हतीच. मंदिरात पोहेचतो पहाटेचे चार वाजलेले होते. सिध्दनाथाने आंबाबाई चे दर्शन घेतले. "या चंडी मधुकैटभादि दलिनी या महिशोन्मुलिनी ...." . सिध्दनाथाच्या तोंडून उत्स्फूर्त पणे देवीभागवतातील मार्कण्डेय ऋषींनी रचलेले जगदंबिकेचे स्तुतीपर श्लोक बाहेर पडले. जगदंबेच्या त्या अलौकिक स्वरूपाकडे बघता बघता त्याच देहभान हरपलं होत. "आई", इतकेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले..... लोकांची वर्दळ आता वाढायला सुरुवात झाली