गीत रामायणा वरील विवेचन - 5 - दशरथा घे हे पायस दान

  • 4.9k
  • 2.2k

राजा दशरथाने वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. भरपूर अन्न वस्त्र धन दान केले. ऋषी मुनी योग्यांचा योग्य तो सन्मान केला. यज्ञात शेवटची समिधा टाकताच त्या यज्ञ कुंडातून अग्निदेव प्रकट होतात. त्यांच्या हातात एक सुवर्ण पात्र असते ज्यात पायस(खीर) असते. ते पायस अग्निदेव दशरथ राजास देतात आणि म्हणतात:- हे दशरथा तू केलेला यज्ञ संपन्न झाला आहे. तुझ्यावर सगळे देव प्रसन्न झाले आहेत. श्री विष्णू देवांनी स्वतः मला आदेश देऊन हा प्रसाद घेऊन इथे पाठवलं आहे हा माझा सन्मान च आहे असे मी मानतो. ह्या पात्रातील पायस तिन्ही राण्यांना भक्षण करण्यास दे. हे पायस अत्यंत मधुर आणि ओजस्वी