गीत रामायणा वरील विवेचन- 4 - लाडके कौसल्ये राणी

  • 4.5k
  • 2.3k

राजा दशरथांच्या मनातही देवी कौसल्ये प्रमाणे पुत्र नसल्याचे शल्य खुपत असते. त्या निराशेतून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राजा दशरथ मृगयेला(शिकारीला) जातात. इकडे एक श्रावण नावाचा कुमार मजल दरमजल करत आपल्या वृद्ध अंध माता पित्यांना कावड मध्ये बसवून त्यांच्या इच्छेनुसार तीर्थाटन करीत असतो. एका पारड्यात पिता एका पारड्यात माता अशी कावड खांद्यावर घेऊन तो एकेका तिर्थस्थळी माता पित्यांना नेत असतो. असाच तो यात्रा करत करत शरयू नदीच्या तीरावर येऊन थांबतो,कावड खाली ठेवतो. त्याच्या पित्याला तहान लागली असल्यामुळे तो जवळील जलाशयातून पाणी आणावयास जातो. तिथेच एका वृक्षावर राजा दशरथ शिकारीची वाट बघत असतो. राजा दशरथ आवाजावरून न बघता त्या दिशेने अचूक बाण सोडून