"दारू न पिणाऱ्या मनोजची अफलातून स्टोरी " लेखक - हेमंत सांबरे आज तर दारू , बियर , वाईन इ इ पिणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा , मानसन्मान असण्याच्या काळात , " दारू न पिणाऱ्या मनोज " ची स्टोरी कुणी तरी वाचेल का ? अशी शंका येणे सहज आहे . माझ्याही मनात तीच शंका आली . म्हणून मी आपला ' शक्य नाहीच ', ' हे होणे नाही ' असे ठामपणे मनोजला सांगून मोकळा झालो होतो . पण मनोज माझ्या खूपच मागे लागला व यावर " तू लिहलेच पाहिजे ! " असा त्याने हट्टच केला . ' अर्थात आता हा मनोज कोण ? '