सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 10

  • 6.4k
  • 1
  • 2.4k

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे १०त्या दिवशी सायंकाळी जानकी,शाम , चंद्रसेना व चरण आजोबांचे आशिर्वाद घेऊन बाहेर पडले.चौघांनीही कोळ्यांच्या वेष धारण केला होता. शामने लागणार सारं सामान दुपारीच होडीत ठेवले होते .त्यात धनुष्य, बाण, तलवारी, आपटल्यावर धूर तयार होणारा दारूगोळा, वळलेल्या दोर्या व खंजीर अशी हत्यारे होती.चौघे पहिल्यांदा चंद्रसेनाची सुटका करणार होती.त्याचवेळी प्रतापराव,दयाळ व दादू कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भिल्ल व कोळ्यांच्या दोन तुकड्या दोन बाजूंनी एकाच वेळी हल्ला करणार होते.प्रतापरावांच्या शस्त्रागारातील शस्त्रे ,तीर कामठी यांनी सज्ज लढवय्ये नक्र बेटावर तयार होते.त्यांना बाहेर पडायला अजून अवधी होता.आज खड्गसिंगांच्या क्रूरतेचा अंत करायचाच असा सार्यांनी चंग बांधला होता. सारा परीसर भयमुक्त करण्यातआपल्याला