मर्डर वेपन - प्रकरण 15

  • 3.5k
  • 2k

प्रकरण १५ पुन्हा कोर्ट सुरु झालं तेव्हा खांडेकर न्यायाधीशांना म्हणाले, “ मला असा साक्षीदार तपासायचा आहे आता, की ज्याने आरोपीला विशिष्ट ठिकाणी गडद रंगाचा गॉगल घातला असतांना पहिलय. आता त्याने तिला ओळखावं म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की आरोपीला तसाच गॉगल घालायला सांगावं.” “ ही जरा विचित्रच विनंती आहे तुमची. मास्क लावून दरोडा टाकणाऱ्याला ओळखण्यासाठी साक्षीदाराला सुद्धा मास्क लावायला सांगितल्यासारखं आहे हे.” न्या.फडणीस म्हणाले. “ मला नाही वाटत तसं. ओळख पटवण्यासाठी अनेक गोष्टी असतात, आवाज, शरीराची ठेवण , डोक्याचा आकार, डोळे, वगैरे. गॉगल हा त्यातलाच एक भाग आहे.” खांडेकर म्हणाले. फडणीस मान हलवून नाही म्हणणार होते,तेवढ्यात त्यांची नजर पाणिनीकडे गेली.